महाराष्ट्रातील युवकांना लोकशाही, सुशासन आणि उत्तरदायी नेतृत्वाच्या मूल्यांनी सुसज्ज करून त्यांना सजग, सक्षम आणि परिवर्तनशील नागरिक व नेते म्हणून घडवणे.
महाराष्ट्र युवा संसदच्या माध्यमातून युवकांना सार्वजनिक धोरणे आणि समकालीन प्रश्न यांविषयी अनुभवाधारित शिक्षण देणे; तर्कशुद्ध विचार, प्रभावी संवाद, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्व कौशल्ये विकसित करणे; तसेच लोकशाही प्रक्रियेत सक्रिय, जबाबदार आणि सकारात्मक सहभागासाठी प्रेरित करणे.