Maharashtra Yuva Sansad Logo MIT-SOGlogo-wrap-1 Logo BCS Logo

राष्ट्रीय सरपंच संसद (RSS)

राष्ट्रीय सरपंच संसद ही स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित संवाद, माहिती व ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी निर्माण केलेले एक अग्रगण्य शैक्षणिक व्यासपीठ आहे. स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली असली तरी भारतातील अनेक गावांमध्ये अजूनही सर्वांगीण विकास ही तातडीची गरज आहे.

या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि भावी नेतृत्वाला ग्रामीण प्रश्नांची सखोल समज देण्यासाठी, MIT WPU च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘रूरल इमर्शन’ हा कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध गावांमध्ये काम करण्याची, ग्रामस्थ व सरपंचांशी थेट संवाद साधण्याची आणि ग्रामीण समाजासमोरील आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळते.

सरपंच संसद या प्रयत्नाला पुढे नेत, सरपंचांचे सक्षमीकरण आणि सर्व सहभागींच्या मुक्त संवादाला प्रोत्साहन देते. या व्यासपीठाद्वारे व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रातील सकारात्मक उपक्रम आणि समस्या सोडविण्याच्या प्रयत्नांविषयी जाणून घेण्याची अनोखी संधी मिळते. आपली कामगिरी मांडताना ते ज्ञानाची देवाणघेवाण करतात आणि चर्चेद्वारे आपली दृष्टी व्यापक करतात.

‘India’ आणि ‘Bharat’ यांतील दरी कमी करण्याची दृष्टी आणि अधिक आदर्श गावांची निर्मिती करण्याचे ध्येय ठेवून, राष्ट्रीय सरपंच संसद हा प्रगतीकडे नेणारा एक महत्त्वपूर्ण अपराजकीय उपक्रम आहे.

LTC